काल स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त कांदिवली पश्चिम इथल्या मठात जाण्याचा योग आला. स्वामींचे दर्शन झाले. काय तो थाट माझ्या स्वामी माऊलीचा, काय ती आरास, एकीकडे स्वामिनामाचा गजर, तर एकीकडे आरती च्या तयारीची लगबग. मन हरखून गेले होते.खूप छान दर्शन झाले. स्वामींचे.घरी परतताना आठवण झाली,कि इथे जवळच कुण्या भक्ताने घराच्या घराच्या भिंतीवर स्वामींच्या तास्विरीची स्थापना केली होती;तिथले २ वर्षांपूर्वी दर्शन झाले होते.आज ऐन योग आला होता परत तिथे जाण्याचा.ती गल्ली शोधत शोधत गेलो. ते स्थान सापडले. एका काळोख्या गल्लीत दोन्ही बाजूला दारूचे अड्डे,चायनीज च्या गाड्या, मवाली पोरांचा धिंगाणा असं असताना समोरच एका भिंतीवर स्वामींची सात्विक शांत वत्सल तस्वीर ध्यानास आली. एका घराच्या भिंतीवर तिची स्थापना केली होति. दर्शन घेतले आणि जवळच्या काही लोकांना त्या मंदिराबाबत विचारले असता त्यांनी एका वृद्ध बाई कडे निर्देश केला,त्यांच्या जवळ जाउन चौकशी केली. त्यांचे नाव चव्हाण, अगदी स्वामींसारखीच बैठक त्यांनी मारली होती. त्या म्हणाल्या ५ वर्षापूर्वी मी इथे स्वामींचा फोटो लावला आणि पूजे-अर्चेला सुरुवात केली. माझी मुला अक्कलकोट ला पायी वारी करतात.खूप प्रचीतीआहे.स्वामी देताहेत. जागा नसल्याने घराच्या भिंतीवरच फोटोची स्थापना केली. सुरुवातीला एक निरंजन आणि अगरबत्तीने आरास केली होती. आता इथे ग्रिल बसवल्या, नियमित दोन वेळेला आरती होते. येत जा कधी कधी. त्यांच्याशी बोलून छान वाटले.
स्वामींचे मुंबईत शेकडो मठ आहेत. त्यांची माहिती आपण संकलित करून स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
।।श्री स्वामी समर्थ।।
जय जय स्वामी समर्थ.
हा मठ मालाड पूर्वेला दफ्तरी रोड वर आहे. एस. के पाटील रूग्णालय आणि खांडवाला लेन या दोघांच्या मध्ये हि अनामिक गल्ली आहे. गल्लीत प्रवेश करतानाच समोरच स्वामींची तस्वीर दिसते.
स्वामींचे मुंबईत शेकडो मठ आहेत. त्यांची माहिती आपण संकलित करून स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
।।श्री स्वामी समर्थ।।
जय जय स्वामी समर्थ.
हा मठ मालाड पूर्वेला दफ्तरी रोड वर आहे. एस. के पाटील रूग्णालय आणि खांडवाला लेन या दोघांच्या मध्ये हि अनामिक गल्ली आहे. गल्लीत प्रवेश करतानाच समोरच स्वामींची तस्वीर दिसते.