Showing posts with label मुंबईतील मठ आणि पत्ते. Show all posts
Showing posts with label मुंबईतील मठ आणि पत्ते. Show all posts

Monday, April 28, 2014

स्वामींचे मालाड पूर्व येथील मंदिर

काल स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त कांदिवली पश्चिम इथल्या मठात जाण्याचा योग आला. स्वामींचे दर्शन झाले. काय तो थाट माझ्या स्वामी माऊलीचा, काय ती आरास, एकीकडे स्वामिनामाचा गजर, तर एकीकडे आरती च्या तयारीची लगबग. मन हरखून गेले होते.खूप छान दर्शन झाले. स्वामींचे.घरी परतताना  आठवण झाली,कि इथे जवळच कुण्या भक्ताने घराच्या घराच्या भिंतीवर स्वामींच्या तास्विरीची स्थापना केली होती;तिथले २ वर्षांपूर्वी दर्शन झाले होते.आज ऐन योग आला होता परत तिथे जाण्याचा.ती गल्ली शोधत शोधत गेलो. ते स्थान सापडले. एका काळोख्या गल्लीत दोन्ही बाजूला दारूचे अड्डे,चायनीज च्या गाड्या, मवाली पोरांचा धिंगाणा असं असताना समोरच एका भिंतीवर स्वामींची सात्विक शांत वत्सल तस्वीर ध्यानास आली. एका घराच्या भिंतीवर तिची स्थापना केली होति. दर्शन घेतले आणि जवळच्या काही लोकांना त्या मंदिराबाबत विचारले असता त्यांनी एका वृद्ध बाई कडे निर्देश केला,त्यांच्या जवळ जाउन चौकशी केली. त्यांचे नाव चव्हाण, अगदी स्वामींसारखीच बैठक त्यांनी मारली होती. त्या म्हणाल्या ५ वर्षापूर्वी मी इथे स्वामींचा फोटो लावला आणि पूजे-अर्चेला सुरुवात केली. माझी मुला अक्कलकोट ला पायी वारी करतात.खूप प्रचीतीआहे.स्वामी देताहेत. जागा नसल्याने घराच्या भिंतीवरच फोटोची स्थापना केली. सुरुवातीला एक निरंजन आणि अगरबत्तीने आरास केली होती. आता इथे ग्रिल बसवल्या, नियमित दोन वेळेला आरती होते. येत जा कधी कधी. त्यांच्याशी बोलून छान वाटले.
स्वामींचे मुंबईत शेकडो मठ  आहेत. त्यांची माहिती आपण संकलित करून स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो.
।।श्री स्वामी समर्थ।।
जय जय स्वामी समर्थ.

हा मठ मालाड पूर्वेला दफ्तरी रोड वर आहे. एस. के पाटील रूग्णालय आणि खांडवाला लेन या दोघांच्या मध्ये हि अनामिक गल्ली आहे. गल्लीत प्रवेश करतानाच समोरच स्वामींची तस्वीर दिसते.  

Monday, April 14, 2014

कांदिवली गाव इथला मठ

     कांदिवली स्टेशन पश्चिम वरून चालत २० मिनिटांच्या अंतरावर कांदिवली गाव आहे.इथे जायला बस सुद्धा बर्याच आहेत.कांदिवली गाव या बस थांब्या जवळ राज हाईट नावाची एक इमारत आहे. तिथे जाऊन कुणाही स्थानिक माणसाला मठाविषयी विचारले असता मोठ्या आस्थेने तुम्हाला मठाचा पत्ता सांगितला जाईल. अक्कलकोट अपार्टमेंट च्या तळमजल्या वर हि सुंदर शांत मठी आहे.

        मठाजवळ आल्यावर विलक्षण चैतन्य, सात्विकता जाणवू लागते.फाटक उघडून आत जातानाच एक औंदुंबर आहे. मठात स्वामींची एक सुहास्यवदन तस्वीर ठेवलेली आहे.स्वामींच्या डोळ्यातले प्रेम बघून मन हरखून जाते.संगमरवरी बैठकीवर स्वामींची चैतन्यदायी मूर्ती आहे.पादुका आहेत.दर्शन घेताना खूप चैतन्य जाणवते. मठ छोटेखानी असला तरी प्रदक्षिणा मार्ग, भरपूर उजेड,खेळती हवा यामुळे ऐसपैस वाटतो,इतकी वर्ष कांदिवलीत राहत असून सुद्धा इतकी छान वस्तू इथे आहे याची मला कल्पनाच नव्हती. मला म्थाविषयी अजून माहिती हवी होती. पण संध्याकाळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळाची पालखी येणार असल्याने सर्वच गडबडीत होते. पण एका काकूंनी सांगितले कि मुंबईतल्या महत्वाच्या मठांमध्ये हा एक मठ आहे.

      श्री शंकरराव काशिनाथ मंत्री हे श्री स्वामी समर्थांचे  भक्त. त्यांनी हा मठ १९७० बांधला. २०१० मध्ये भारत मंत्री यांनी मठाचा जीर्णोद्धार केला. या मठामध्ये प.पु स्वामीभक्त आनंद भारती महाराज(लक्ष्मण कोळी-ठाणे) यांनी स्वामींच्या पादुका स्वामींच्या आज्ञेनुसार दिल्या. अक्कलकोटा जवळ च्या शिवपुरी येथील प.पु गजानन महाराज यांनी या मठाला भेटी दिल्या आहेत. चोळप्पा महाराजांचे वंशज प.पु अण्णू महाराज यांनी सुद्धा इथे भेटी दिल्या आहेत.
      इथे वेळोवेळी उत्सव साजरे केले जातात .सकाळ संध्याकाळ आरती होते. आता मठाची व्यवस्था शंकररावांच्या पुत्री मेघा ताई बघतात.

मठाचा पत्ता :
      अक्कलकोट अपार्टमेंट,श्री स्वामी समर्थ लेन,
      कांदिवली महानगर पालिका शाळेजवळ,
      कांदिवली गाव,कांदिवली पश्चिम.

मठात कसे जाल :
      कांदिवली रेल्वे स्थानक पश्चिम वरून चालत २० मिनिटांवर कांदिवली गाव हा बस थांबा आहे. इथे मागेच हा मठ आहे. तसेच कांदिवली स्थानकावरून बस नंबर २०४ आणि २०७ इथपर्यंत जातात.

मठाच्या वेळा :
        सकाळी ६ ते १२.३०
        संध्याकाळी ७ ते ९.३०
आरती सकाळी ८.३० वाजता
आणि संध्याकाळी ७ वाजता.


।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।


       
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||