अक्कलकोट चे राजे शहाजी राजे निर्वतल्या नंतर मालोजीराजे गादीवर नुकतेच बसले होते.चिंतोपंत टोळांना सांगितल्या प्रमाणे स्वामी सोलापूर हून अक्कलकोट ला आले.यवन रीसालदाराला रिकाम्या चिलिमितुन धूर काढून दाखवण्याची पहिली लीला समर्थांनी दाखवली.नंतर ऐन दुष्काळात चोळाप्पाच्या कोरड्या ठणठणीत विहिरीला पाणी आणून दाखवण्याचा चमत्कार केला. तेव्हा अक्कलकोट वासी जनांना स्वामींची महती कळू लागली होती.थोडे दिवस गेल्यानंतर दरम्यान मालोजीराजे दरबारात बसले असता त्यांच्या कानावर अक्कलकोटात कुणी चमत्कारी साधू अवतरलेत अशी वार्ता राजांच्या कानावर पडली. त्यावेळी मालोजीराजे म्हणाले 'ते जर खरंच साधू पुरुष असतील तर ते आत्ता या क्षणी आम्हाला इथे दर्शन देतील.' एवढ्यात स्वामींनी तिथे प्रकट होऊन मालोजीराजांच्या मनातला विकल्प नाहीसा करून त्यांची इच्छा पुरवली.त्या नंतर अनेकानेक लीला स्वामी करत च होते.आणि मालोजी राजांची श्रद्धा स्वामींवर जडली.
पण मनुष्याची भक्ती तेव्हा परमेश्वर कबुल करतो जेव्हा मनुष्य देहबुद्धी अहंकारी वृत्ती सोडून परमेश्वराला शरण जातो.
मालोजी राजे संस्थानिक होते.साहजिक च त्यांना इतमाम, दरबार, उंची राहणी या सगळ्यांचा शौक होताच.
एके दिवशी स्वामी वटवृक्षा खाली बसले असता मालोजीराजे दर्शनास आले.
पण स्वतः हत्तीच्या अंबारीत बसून ,छत्र चामरे, अशा थाटात लवाजम्यासहित आले. राजा आपल्या वैभवाच्या तंद्रीत हत्तीवरून खाली उतरला, समर्थांपुढे येऊन हात जोडून उभा राहिला इतक्यात खाडकन आवाज आला. स्वामींनी राजाच्या कानाखाली मारली, राजाची मानाची पगडी ३ हात बाजूला जाउन पडली. राजाला काय झाले समजले नाही. स्वामी क्रोधाने म्हणाले ' अरे तुझे मोठेपण तुझ्या घरात, ऐसे बुद्बलके राजे हम हररोज बनाते है!
मग राजास लक्षात आले. कि आपण हा मोठेपणाचा थाट करून दर्शनास येतो. त्यावेळी आपल्या मनात
अहंकार भावना असते.
त्या दिवसापासून राजा स्वामी कुठेही असले म्हणजे दर्शन करावयास आला कि हत्ती,छत्र चामरे लांब उभी करून स्वतः पादचारी चालत येई व इतर भाविकांप्रमाणे,सामन्याप्रमाणे दर्शन घेई. राजाला कळून चुकले आपण फक्त संस्थानिक आहोत पण स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांडनायक आहेत.
स्वामींनी असाच भल्या भल्यांचा ताठा जिरवला. बाष्कळ अभिमानाने अंध झालेल्यांना सन्मार्गावर आणले.
स्वामी ब्रह्मांड नायक आहेत याचा दाखला देणाऱ्या अनेक कथा आपण या ब्लॉग च्या माध्यमातून पाहूच.
||श्री स्वामी समर्थ||
||जय जय स्वामी समर्थ ||
No comments:
Post a Comment