श्री स्वामी माऊलीची एक चित्तवेल्हाळ चित्तवृत्ती.
श्री स्वामी समर्थ माऊलीची बालोन्मतपैशाच्य वृत्ती प्राकृत जनांना वेड्यासारखी वाटे.पण अशा लोकांना स्वामी त्यांच्या गूढ बोलण्यातून किंवा कृतीतून अन्तःसाक्षित्वाची खुण पटवून,क्षणात अवतारी असल्याचा दाखला देऊन त्यांना भक्ती मार्गाला लावीत.त्यांचा नूर कधी उग्र असला तर राजे रजवाडे असोत किंवा स्वामींचे निकटवर्तिय सेवेकरी असोत त्यांना स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहवत नसे किंवा जवळ उभे राहण्याचा धीर होत नसे. स्वारी रागात असली कि ७-७ दिवस राग जात नसे. पण कुणी दुखी कष्टी असेल तर या माऊलीचं हृदय चटकन द्रवायचं.आणि म्हणूनच स्वामींची लेकरं स्वामी समर्थांना 'भक्तवत्सल माय'असं म्हणतात,मानतात.
||श्री स्वामी समर्थ ||
||जय जय स्वामी समर्थ||
No comments:
Post a Comment