Thursday, March 13, 2014

आरती

जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ|
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा॥धृ॥
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी। जगउध्दारासाठी राया तू फिरसी ॥
भक्तवत्सल खरा,तू एक होसी।
म्हणूनी शरण आलो,तुझे चरणाशी॥ जय॥१॥
त्रैगुण परब्रम्ह,तुझा अवतार।त्याची काय वर्णू,लीला परामर॥ 

शेषादिक शिणले ,न लगे त्या पार।
जेथे जडमूढ कैसा ,करु मी विस्तार ॥जय॥२॥
देवादि देवा, तू स्वामीराया। निर्जर मुनिजन ध्यातो,भावे तंव पाया।
तुजसि अर्पण केली, आपुली ही काया॥
शरणागता तारी तू स्वामीराया ॥जय॥३॥
अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले। किर्ती ऐकूनी कानी,चरणी मी लोळे॥
चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले।
तुझ्या सुता न लगे,चरणा वेगळे ॥४॥
||जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्थ||

)

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||