Thursday, June 12, 2014

विश्वास

|| श्री स्वामी समर्थ ||
आयुष्यात येणा-या कठीण प्रसंगी असे वाटते अरे,
आपण चागले वागतो, स्वामीची भक्ती करतो, मग
आपल्याला त्रास का ? आणि वाटते स्वामी असे
का हो ?
पण लक्षात ठेवा देव म्हणा, स्वामी म्हणा, ते
आपल्या भक्तांना प्रथम काटेरी मार्गातून पायवाट
करायला लावतात. पण पुढील आयुष्यात
त्यांचासाठी देव फुलाच्या गालिच्याची पायवाट करून
ठेवतो.
फुलाच्या पायवाटेवरून चालायचे असेल , तर हा त्रास
आपण स्वामीच्या भक्तीच्या जोरावर कणखरपणे सहन
करायचा व माझा असा विश्वास आहे की,
आपल्या सर्वांसाठी फुलांची पायवाट नक्की आहे.
निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो... झाडाला दगड
मारला तरी ते आपल्याल फळ देते. आपण दुस-यावर
जेव्हा गुलाबपाणी उडवतो तेव्हा लक्षात घ्या, त्याचे
चार थेंब नक्की आपल्या अंगावर उडतात. म्हणूनच
आयुष्भर दुस-यांचे जीवन आनंददायी, सुगंधित
करण्याचा आपण प्रयत्न करायचा.
|| श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ||
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||